महिलांनी अभिमानापेक्षा स्वाभिमान बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:34+5:302021-03-10T04:33:34+5:30
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. के. बी. गंगने होते, तर बार्शी ...

महिलांनी अभिमानापेक्षा स्वाभिमान बाळगावा
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. के. बी. गंगने होते, तर बार्शी येथील ब्रह्माकुमारी अनिता भारतलाल करवा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा बी.आर. बोडके, डॉ. एस. एन. इप्पर, प्रा. सुदर्शन स्वामी, डॉ. अर्चना कचरे, ब्रह्माकुमारी अंजू, हंसा, अनू, शीला यांची उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमारी अनिता करवा म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, समाधान, आत्मपरीक्षण, स्वत्वाची जाणीव व विकासाचा ध्यास असावा.
अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ. के.बी. गंगने यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा व्ही.आर. पुरी यांनी केले. आभार प्रा. व्ही.एस. भिसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वैशाली शहाणे, प्रा.एस.के. शेजूळ, प्रा. उज्ज्वला कदम, अरुणा स्वामी, प्रा. एन.जे. वडमारे, मीना डक, जी. व्ही. मुसळे, एस. आर. शेख, ए. ए. पवार, आर. एस. साळवे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
090321\09bed_18_09032021_14.jpg
===Caption===
महिला दिनानिमित्त बोलताना ब्रम्हाकुमारी अनिता करवा.