पतीस जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 11:53 IST2019-05-06T11:52:32+5:302019-05-06T11:53:08+5:30

पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. 

women raped by threatening to kill her husband in Beed | पतीस जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

पतीस जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

कडा (बीड ) : पतीस जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर गावातीलच एकाने वर्षभरापासून वारंवार बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. 

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील तरूण संदिप कचरू चौधरी याने गावातीलच  एका 26 वर्षीय विवाहित महिलेस तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देत एक वर्षापासून वारंवार बलात्कार केला. अखेर पिडीत  महिलेने रविवारी (दि.५ ) संदिप विरोधात ( 29) आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संदीप याला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गोडसे करत आहेत.

Web Title: women raped by threatening to kill her husband in Beed