बीडमध्ये पोटात बाळ घेऊन महिला ऊसतोडीच्या फडात; न्यायालयाच्या आदेशाचा ‘पाचोरा’!

By सोमनाथ खताळ | Updated: February 19, 2026 18:31 IST2026-02-19T18:29:56+5:302026-02-19T18:31:04+5:30

बीडमधील वास्तव : पाच महिन्यांचा कालावधी झालेल्या १० महिला फडात

Woman with baby in her womb in sugarcane field in Beed; Court order 'neglected'! | बीडमध्ये पोटात बाळ घेऊन महिला ऊसतोडीच्या फडात; न्यायालयाच्या आदेशाचा ‘पाचोरा’!

बीडमध्ये पोटात बाळ घेऊन महिला ऊसतोडीच्या फडात; न्यायालयाच्या आदेशाचा ‘पाचोरा’!

बीड : उच्च न्यायालयाने ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्याबाबत दिलेल्या निकालाचे आणि निर्देशांचे जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘पाच महिन्यांवरील गर्भवतींना कामावर घेऊ नये’ असे स्पष्ट आदेश असतानाही, बीड जिल्ह्यात चक्क १० गर्भवती महिला फडावर कष्टाची कामे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कामगार विभाग आणि साखर आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

ऊसतोड मजुरांच्या गंभीर समस्यांची दखल घेत न्यायालयाने २०२३ मध्ये ‘सुमोटो’ याचिका दाखल केली होती. मार्च २०२५ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार, पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ गर्भवती असलेल्या महिलांना ऊसतोडीच्या कामावर लावणे बेकायदेशीर आहे. असे आढळल्यास संबंधित मुकादमावर कारवाई करून साखर कारखान्याचा परवाना रद्द किंवा निलंबनाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, २०२५-२६ च्या चालू हंगामात या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. एवढेच नव्हे तर इतरही निर्देशांकडे संबंधित कार्यालयाकडून दुर्लक्ष केेले जात असल्याचे सांगण्यात आले.

गर्भवती असतानाही कष्ट
आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांत ५४ ऊसतोड मजूर गर्भवती महिलांची नोंदणी झाली. धक्कादायक म्हणजे, यातील १० महिला नोंदणी वेळीच पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार या महिलांना सेवेतून प्रसूती रजा मिळणे अपेक्षित असताना, त्या जीवघेण्या कष्टाचे काम करत आहेत.

कोण काय म्हणतंय....
आरोग्य विभागाकडे विचारणा केल्यावर आपल्याकडे नोंदणी केली जाते. तसेच आशाताई, डॉक्टरांमार्फत गर्भवतींनी काम करू नये, असे सुमपदेशन केले जात असल्याचा दावा केला. तर साखर कार्यालयाकडून आरोग्य विभागाने छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाला अहवाल द्यावा. त्यांनी तो आम्हाला पाठविल्यावर आम्ही त्याची खात्री करतो, असे सांगण्यात आले. यावरून हे दोन्ही विभाग उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

२०१९ नंतर ५७६ गर्भपिशवी शस्त्रक्रिया
जिल्ह्यात एकूण ८४३ गर्भपिशवी शस्त्रक्रियांची नोंद असून, त्यातील २६७ शस्त्रक्रिया २०१९ नंतर, तर ५७६ शस्त्रक्रिया २०१९ पूर्वी झाल्या आहेत. या संदर्भात अधिक सखोल माहिती गोळा केली जात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील मजुरांचे वास्तव
बीड जिल्ह्यात ९ कारखाने व एका गुऱ्हाळावर ५,०४२ मजूर (२,२२३ महिला) कार्यरत आहेत. एप्रिल ते जानेवारी दरम्यान जिल्ह्यात ४०,४७१ गर्भवतींची नोंद झाली. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत फडावर ५४ गर्भवती महिलांची नोंद असून, त्यातील १० महिला ५ महिने पूर्ण झालेल्या आहेत, जे चिंतेचे वास्तव अधोरेखित करते. राज्यात हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मजुरांची स्थिती
जिल्ह्यातील एकूण ऊसतोड मजूर - १७५०९३
पुरूष - ९६६१७
महिला - ७८४७६
स्थलांतरीत मजूर - १७०५१
सध्या बीड जिल्ह्यांतर्गत कार्यरत मजूर - ५,०४२
महिला मजूर : २,२२३
पुरूष मजूर : २८१९

Web Title : बीड में गर्भवती महिलाएं गन्ना काटने को मजबूर, अदालत के आदेशों की अनदेखी।

Web Summary : बीड में अधिकारी अदालत के आदेशों का उल्लंघन कर रहे हैं, गर्भवती महिलाओं को गन्ना खेतों में काम करने के लिए मजबूर किया जा रहा है। प्रतिबंध के बावजूद दस गर्भवती महिलाएं, जिनमें से कुछ पांच महीने से अधिक की हैं, काम कर रही हैं। इससे श्रम विभाग और चीनी आयुक्त की देखरेख पर चिंता जताई जा रही है। कई गर्भाशय निकालने के ऑपरेशन महिला मजदूरों के सामने आने वाले स्वास्थ्य जोखिमों को उजागर करते हैं।

Web Title : Pregnant women forced to cut sugarcane in Beed, court orders ignored.

Web Summary : Beed authorities flout court orders, forcing pregnant women into sugarcane fields. Ten pregnant women, some over five months, are working despite a ban. This raises concerns about labor department and sugar commissioner oversight. Many hysterectomies highlight the health risks faced by women laborers.