पांढरी येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:57 IST2019-06-06T00:56:12+5:302019-06-06T00:57:03+5:30

तालुक्यातील पांढरी येथील पन्हाळकर वस्ती वरील स्वाती राजू शेंठे (२७) या महिलेचा संर्प दंशाने बुधवारी सकाळी मृत्यू झाला.

The woman with a snake bite in white at the death | पांढरी येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

पांढरी येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

आष्टी : तालुक्यातील पांढरी येथील पन्हाळकर वस्ती वरील स्वाती राजू शेंठे (२७) या महिलेचा संर्प दंशाने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री झोपेत असताना सापाने दंश केला होता. मात्र, झोपेत असल्यामुळे सापाने दंश केल्याचे कळून आले नाही. पहाटे ३ वाजता त्यांना चक्कर येत असल्याचे जाणवले याची कल्पना त्यांनी घरच्या व्यक्तींना दिली. त्यानंतर त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रुग्णालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत झाल्यामुळे तेथील गेट बंद होते. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालाय स्वाती यांना घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मृत घोषीत केले. पन्हाळकर वस्ती येथे त्यांच्या शेतात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: The woman with a snake bite in white at the death