आष्टीत विज अंगावर कोसळ्याने महिलेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:29 PM2019-11-04T15:29:48+5:302019-11-04T15:31:27+5:30

शेतात कामा करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली

Woman dies of electicity fallen in Aashti | आष्टीत विज अंगावर कोसळ्याने महिलेचा मृत्यू 

आष्टीत विज अंगावर कोसळ्याने महिलेचा मृत्यू 

Next

कडा :  शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४ ) दुपारी तालुक्यातील ब्रम्ह्गाव येथे घडली. छबाबाई पांडुरंग ढोबळे (३६ ) असे मृत महिलेचे नाव आहे. 

छबाबाई यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्या ब्रम्हगाव येथे आपल्या भावाच्या घरी राहत. सोमवारी दुपारी त्या नेहमीप्रमाणे शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात केली. काही कळायच्या आत छबाबाई यांच्यावर वीज कोसळली. गंभीर भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईप्रसाद पवार करत आहेत.

Web Title: Woman dies of electicity fallen in Aashti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.