मळणीयंत्रामध्ये वेणी अडकल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:49 IST2020-03-03T22:49:20+5:302020-03-03T22:49:53+5:30
तालुक्यातील पिंपळनेर येथे ज्वारीचे खळे करताना मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

मळणीयंत्रामध्ये वेणी अडकल्याने महिलेचा मृत्यू
शिरुर कासार : तालुक्यातील पिंपळनेर येथे ज्वारीचे खळे करताना मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
भीमाबाई पांडुरंग जायभाये (वय५७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मळणी करीत असताना गोळा झालेली ताडपत्री नीट करण्यासाठी भीमाबाई वाकल्या. या दरम्यान, केसाची वेणी मळणीच्या चाकात अडकल्याने आतमध्ये खेचल्या गेल्या. त्यांना तात्काळ रायमोहा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.