दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:49 IST2019-05-24T18:47:37+5:302019-05-24T18:49:54+5:30
डोक्याला गंभीर मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार
बीड : कपडे खरेदीसाठी दुचाकीवरुन पतीसह गेवराईकडे जात असलेल्या महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला. यामुळे ती रस्त्यावर पडली. डोक्याला गंभीर मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळ शुक्रवारी सकाळी घडली.
गेवराई तालुक्यातील खांडवी येथील नितीन थोरात हे पत्नी मनिषासह (वय२०) कपडे खरेदीसाठी खांडवीहून गेवराईकडे जात होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांची दुचाकी जातेगाव जवळ आली असताना मनिषा यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या पाठीमागील चाकात अडकून चाकाला गुंडाळला गेला. यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करुन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी मनिषा यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी सरकारी दवाखाना चौकीत नोंद करण्यात आली आहे.