शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'आकस्मिक मर' आणि 'अळीचा प्रादुर्भाव'; बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकांवर रोगांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:07 IST

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचा चिखल, बाधित पिकांचे व्यवस्थापन होणार का?

बीड : जिल्ह्यात ७ लाख ८९ हजार ६७६ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे, ही पेरणी सरासरी क्षेत्राच्या ९७.६ टक्के आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, ते बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असला, तरी अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मात्र, अतिरिक्त पाऊस झाल्याने पिकांचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात बाजरीची ५०.५ टक्के, तर मक्याची ९४.२ टक्के पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके सध्या पक्वतेच्या किंवा काढणीच्या अवस्थेत आहेत. अतिवृष्टीमुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. मका पिकावर काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. तुरीची पेरणी ८६.६ टक्के झाली असून, पीक सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. अतिवृष्टी झालेल्या भागात 'मर' रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना 'बायोमिक्स'ची आळवणी करण्याची शिफारस कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

मूग आणि उडदाची परिस्थितीमुगाची ७६.५ टक्के, तर उडदाची १४८.७ टक्के पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. मुगाची ९०-९५ टक्के, तर उडदाची ५०-६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. सध्या मुगाची सरासरी उत्पादकता ९५१.९४ किलो/हेक्टर तर उडदाची ९२८.७८ किलो/हेक्टर आहे. पावसामुळे काढणीला उशीर होत असून, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

'आकस्मिक मर' रोगाचा प्रादुर्भावसोयाबीनची पेरणी सर्वाधिक १२८ टक्के झाली आहे. पीक सध्या शेंगा पक्व होण्याच्या किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. वडवणी आणि गेवराई तालुक्यात शेंगा आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'क्वीनलफोस' किंवा 'प्रोफेनोस' ची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कापसाची पेरणी ७७.९ टक्के झाली असून, पीक बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी 'आकस्मिक मर' रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, युरिया, पांढरा पोटॅश आणि कॉपर ऑक्सिक्लोराइडच्या मिश्रणाची आळवणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र