लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: व्यसन नसतानाही पत्नीने संगनमत करून पतीला बळजबरीने व्यसनमुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि मानवी हक्क आयोगाकडे पीडित ग्रामसेवकाने न्याय मागितला असून, व्यसनमुक्ती केंद्र व पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गणेश (नाव बदलले) या ग्रामसेवकाच्या तक्रारीनुसार, ३ जानेवारी रोजी रात्री चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने बळजबरीने उचलले आणि कारमध्ये टाकले. प्रत्यक्षात त्यांना पोलिस स्टेशनला न नेता एका व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले.
नातेवाईकांची दिशाभूल
गणेश यांना केंद्रात डांबल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला असता, पत्नीने सुरुवातीला ते बाहेरगावी ट्रेनिंगला गेल्याचे सांगून दिशाभूल केली. मात्र, सत्य समोर आल्यावर ‘पगार खाते संयुक्त करा आणि घर नावावर करा, तरच व्यसनमुक्ती केंद्रातून सोडते,’ अशी अट पत्नीने घातली. अखेर गणेशच्या भावांनी ‘जिल्हा विधिसेवा प्राधिकरणा’कडे तक्रार केल्यानंतर, प्राधिकरणाच्या हस्तक्षेपामुळे ८ जानेवारी रोजी त्यांची सुटका झाली.
Web Summary : In Beed, a wife allegedly forcibly confined her husband in a rehab center, demanding he transfer the house ownership to her for his release. He was abducted by strangers and held until his brother sought legal intervention.
Web Summary : बीड में, एक पत्नी ने कथित तौर पर अपने पति को जबरन नशा मुक्ति केंद्र में रखा, और रिहाई के लिए घर अपने नाम करने की मांग की। अजनबियों ने उसका अपहरण कर लिया और तब तक रखा जब तक कि उसके भाई ने कानूनी हस्तक्षेप नहीं किया।