जमीन नावावर करण्यावरून पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:15 IST2018-10-13T00:15:37+5:302018-10-13T00:15:59+5:30

नांदवीत नसलेल्या पत्नीस ‘तुझ्या वडिलांची जमीन नावावर का करीत नाहीस’ या कारणावरून माहेरी येऊन पतीसह तिघांनी घरात मारहाण केली. ही घटना केज शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Wife to be killed in the name of land | जमीन नावावर करण्यावरून पत्नीस मारहाण

जमीन नावावर करण्यावरून पत्नीस मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : नांदवीत नसलेल्या पत्नीस ‘तुझ्या वडिलांची जमीन नावावर का करीत नाहीस’ या कारणावरून माहेरी येऊन पतीसह तिघांनी घरात मारहाण केली. ही घटना केज शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरापासून जवळच असलेल्या इंगळे वस्तीवर माहेरी राहत असलेल्या सुजाता सचिन भिसे या महिलेस वडिलांच्या नावावरील जमीन नावे करण्यासाठी तिचा पती सचिन भिसे, दीर विलास भिसे, बाळासाहेब भिसे (रा. सारसा, ता. जि. लातूर ) यांनी तगादा लावला होता. मात्र तिने जमीन नावावर करण्यास नकार दिल्याने गेल्या दोन महिन्यापासून तिला नांदवीत नव्हते. त्यामुळे ती माहेरी राहत असताना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तिघांसह भागवत थोरात ( रा. मुक्ताई नगर केज ) यांनी वस्तीवर येऊन सदर महिलेच्या घरात घुसून लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच जमीन नावावर केली नाही तर जीवे मारू अशी धमकी दिली.
सुजाता भिसे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध केज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Wife to be killed in the name of land