जिवे मारण्याची धमकी देत विधवा महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:11 IST2020-02-09T00:10:51+5:302020-02-09T00:11:18+5:30

आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील विधवा महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देत येथील एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली, याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Widow woman tortured to death | जिवे मारण्याची धमकी देत विधवा महिलेवर अत्याचार

जिवे मारण्याची धमकी देत विधवा महिलेवर अत्याचार

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील घटना

कडा : आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील विधवा महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देत येथील एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली, याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखदेव रामदास खिळदकर असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील एका २९ वर्षीय विधवा महिला याप्रकरणी फिर्यादी आहे. महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या पतीचे तिला पैसे मिळाले होते. या पैशातून तिने सुखदेव याला जवळपास ५ लाख रुपये दिले होते. दिलेले पैसे परत देत नसल्याने तिने त्याला तगादा लावला होता. ‘आज देतो उद्या देतो’ असे सांगून सुखदेव वेळ मारून नेत होता. आणि यातूनच आरोपीने घरात कोणी नसल्याची संधी साधून विधवा महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने अंभोरा पोलीस ठाण्या सुखदेव रामदास खिळदकर याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणाचा पुढील तपास सोपनि ज्ञानेश्वर कुकलारे हे करीत आहेत.

Web Title: Widow woman tortured to death