शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:40 IST

माजलगाव नगरपालिकेसमोर घडलेल्या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Beed Crime: 'आम्ही रात्री गप्पा मारत असताना तू व तुझा भाऊ पोलिसांना बोलावून आमची बैठक का मोडतात', अशी विचारणा करीत कत्तीने वार करून एकास जखमी व इतरांना मारहाण करण्यात आली. माजलगाव नगरपालिकेसमोर घडलेल्या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

इम्रान मुर्तुज बेग व भाऊ अरबाज हे रात्री घराकडे दुचाकीने जाताना नगरपालिकेसमोर गांधनपुरा येथील शकील कुरेशी, इम्रान कुरेशी, जैत कुरेशी, अभेद कुरेशी, सोफियान कुरेशी व इतर तिघांनी मिळून दुचाकी अडवली. 

'आम्ही रात्री गप्पा मारत असताना तू व तुझा भाऊ पोलिसांना बोलावून आमची बैठक का मोडतात', असे म्हणत जैद कुरेशी व अबे कुरेशी यांनी इम्रान व अरबाज बेग यांची गचुरी धरत दुचाकीवरून खाली ओढले. 

सोफियान कुरेशी याने शिवीगाळ केली, तर शकील कुरेशी याने त्याच्या हातातील लोखंडी कत्तीने वार केला असता हात आडवा घातल्याने उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. इम्रान कुरेशी याने त्याच्या हातातील धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत करत जखमी केले.

आरडाओरडा झाल्याने परिसरातील अनेक घटनास्थळी आले; परंतु मारहाण करणारे पळाले. मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इम्रान मुर्तुज बेग यांनी तक्रार दिली. त्यानुसार गांधनपुरा येथील शकील कुरेशी, इम्रान कुरेशी, जैत कुरेशी, अभेद कुरेशी, सोफियान कुरेशी व इतर तिघांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Argument over meeting leads to knife attack, injuries.

Web Summary : An argument in Beed escalated when a group attacked two brothers, accusing them of disrupting their meeting by calling the police. One brother was seriously injured in the knife attack. Police have registered a case against five individuals.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीसPoliceपोलिस