शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला

By सोमनाथ खताळ | Published: April 3, 2023 08:06 PM2023-04-03T20:06:18+5:302023-04-03T20:09:21+5:30

बीडमधील घटनेने खळबळ, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

While coming home from school, the girl was teased, the road romeo attacked the grandfather with a knife | शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला

शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला

googlenewsNext

बीड : शाळेतून घरी जाणाऱ्या ८ वीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून छेड काढली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आजोबावर चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बीड शहरातील वर्दळीच्या असलेल्या तुळजाई चौकात सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील पीडिता ही १४ वर्षांची आहे. बीड शहरातील एका शाळेत शिक्षणासाठी ती रोज ये-जा करते. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शाळा संपल्यानंतर गावी जात होती. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिला तुळजाई चौकात अडविले. तिचा हात धरून छेड काढली. तिने लगेच आपल्या चुलत आजोबाला सांगितले. त्याने जाब विचारताच त्यांना शिवीगाळ करून निघून गेले. 

पीडितेने हा सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. नंतर सर्व नातेवाईक या टवाळखोरांकडे पंचशीलनगर भागात गेले. तेथेच सुदर्शन बांगर व अनिकेत नांगरे या दोघांनी पीडितेच्या चुलत आजोबावर चाकुने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाल्याने तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या फिर्यादीवरून सुदर्शन व अनिकेत यांच्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात रात्री साडे सात वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: While coming home from school, the girl was teased, the road romeo attacked the grandfather with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.