शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

काय तुझ्या मनात? सांग माझ्या कानात, खुल्लमखुल्ला रे....!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:49 AM

काय तुझ्या मनात.. सांग माझ्या कानात.. खुल्लमखुल्ला रे..’ हे मराठी चित्रपटातील गाणे मध्यंतरीच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते. एकमेकाचा रुसवा, फुगवा काढण्यासाठी, चिडविण्यासाठी या गाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला.

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्ककाय तुझ्या मनात.. सांग माझ्या कानात.. खुल्लमखुल्ला रे..’ हे मराठी चित्रपटातील गाणे मध्यंतरीच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते. एकमेकाचा रुसवा, फुगवा काढण्यासाठी, चिडविण्यासाठी या गाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला. बीडचे स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना या गाण्यातील पंक्तीप्रमाणे विचारण्याची वेळ बारामतीप्रमाणेच बीडकरांवरही आली आहे. ‘जिल्ह्यात रुसायचे आणि जिल्ह्याबाहेर हसायचे’ असे क्षीरसागर बंधूंचे राजकीय वागणे इतरांना कोड्यात टाकणारे असले तरी पक्षात अलिप्त राहूनही त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि विरोधकांना आपली राजकीय ताकद पुन्हा पुन्हा दाखवून दिली आहे, हे ही तितकेच खरे.नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस ७४ मतांनी विजयी झाले. अशक्यप्राय असलेली विजयश्री भाजपाने सहजरीत्या मिळविली असली तरी विजयाचा गुलाल मात्र बीडच्या नगर पालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरेश धसांवर मनसोक्त उधळला होता. विजयाच्या या गुलालात सुरेश धसांपेक्षा क्षीरसागरच अधिक रंगले होते. पक्षाचा उमेदवार पडला म्हणून राष्टÑवादी काँग्रेस पक्षात सुतकी वातावरण असताना हे गुलालाचे रंग उधळविणे म्हणजे जिल्हातील विरोधकांना क्षीरसागर बंधूंचा एक प्रकारचा इशाराच होता. धसांनी आपल्या अशक्यप्राय विजयाचे गुपित म्हणजे ‘घड्याळ बांधणाऱ्या हाता’नी केलेली मदत, असे कोड्यात दिलेले उत्तर काही तासांतच उलगडले.विजयानंतर गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन धसांनी थेट क्षीरसागर गडावर म्हणजे बीड पालिकेत प्रवेश करून बीडच्या राजकारणातील मुत्सद्दी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांची प्रेमाने गळाभेट घेतली. ही गळाभेट जिल्ह्याच्या भावी राजकारणात भल्याभल्यांना धडकी भरावी, अशीच होती. दीड वर्षांपासून क्षीरसागर बंधुंची भूमिका ‘तळ्यात मळ्यात’ अशीच पहावयास मिळाली. दिल्लीत झालेल्या तेली समाज एकता संमेलनासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह व्यासपीठावर होते. तत्पूर्वी या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. समाजाचा कार्यक्रम होता, असे गृहीत धरूया. परंतु, एकीकडे जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवत रुसवेपणा दाखवायचा आणि जिल्ह्याबाहेर पक्षश्रेष्ठींच्या मांडीला मांडी लावून बसण्यामुळे पक्षात चलबिचल वाढली आहे. स्थानिक स्वराज्यचा निकालानंतर शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. अजित पवार आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यातील हास्यविनोदाने विरोधकांच्या पोटात मात्र निश्चितच गोळा उठला असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणBeedबीडAjit Pawarअजित पवारJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस