बीडमध्ये काय चाललंय? चक्क एसपी ऑफिसमधून पोलिसानेच चोरल्या १० बॅटऱ्या

By सोमनाथ खताळ | Updated: December 26, 2024 16:18 IST2024-12-26T16:18:01+5:302024-12-26T16:18:54+5:30

कुंपणच शेत खात आहे; या प्रकरणी सहायक फौजदारासह दुकानदारही ताब्यात

What is going on in Beed? The police stole 10 batteries from the SP office | बीडमध्ये काय चाललंय? चक्क एसपी ऑफिसमधून पोलिसानेच चोरल्या १० बॅटऱ्या

बीडमध्ये काय चाललंय? चक्क एसपी ऑफिसमधून पोलिसानेच चोरल्या १० बॅटऱ्या

बीड : जिल्ह्यात आगोदरच कायदा व सुव्यवस्था बिघडललेली आहे. यात आगोदरच पोलिस वादात सापडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल १० बॅटऱ्यांची चोरी झाली. विशेष म्हणजे, या बॅटऱ्या पोलिसानेच चोरल्या आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.

अमित मधुकर सुतार (रा.खोकरमोहा ता.शिरूरकासार) व माधव गोरक्षनाथ जानकर (रा.वडगाव गुंदा ता.बीड) असे आरोपींची नावे आहेत. सुतार हे सहायक फौजदार असून जानकार हा दुकानदार आहे. नोव्हेंबर महिन्यात सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या. तर २५ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्यापूर्वी आणखी ७ बॅटऱ्यांची चोरी केली. सुतार हे वायरलेस विभागात कार्यरत आहेत. पोलिस उपनिरीक्षक बाबुलाल यल्लाप्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड, कर्मचारी अशपाक सय्यद, परजणे हे करत आहेत. सध्या हे दोघेही ताब्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: What is going on in Beed? The police stole 10 batteries from the SP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.