शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:32 AM

पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

ठळक मुद्देअंबाजोगाईत राष्ट्रीय पाणी परिषद : महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती; राजेंद्रसिंह राणा यांचे मार्गदर्शन

अंबाजोगाई : पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.येथील मानवलोक येथे राजेंद्र राणा यांच्या दुष्काळमुक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ तसेच राष्ट्रीय पाणी परिषदेचे उद्घाटन राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी यशदाचे डॉ. सुमंत पांडे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, वनराईचे किशोर धारिया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सुनिताजी (दिल्ली), डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अरूंधती पाटील यांची उपस्थिती होती.या पाणी परिषदेत वाढता दुष्काळ, बदलते हवामान, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी, वृक्षारोपण, लोकसहभागातून पुनर्भरणासाठी करावयाची कामे, दुष्काळी स्थितीत सामाजिक संस्थांकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना करण्यात येणारी मदत अशा विविध बाबींवर चर्चा झाली. डॉ.सुमंत पांडे, सुनिताजी, अरविंद कर्वे, रुपाली ठोंबरे, पांडुरंग साबळे, राजेश पंडित, रमेश भिसे, चंदू बडवाई, जयाजी पाईकराव, प्रकाश पाटील, नरेंद्र चुंग, डॉ. नरेंद्र काळे आदींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. तसेच मराठवाड्यात ८२ टक्के खडक हा जमिनीतील पाणी मुरवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा अहवाल डॉ. अशोक तेजानकर यांनी मांडला. पाणी बचतीसाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची चर्चा या परिषदेत झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते एका माठात पाणी सोडून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पृथ्वीचे जलपुनर्भरण ही संकल्पना यावेळी मांडण्यात आली.प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अनिकेत लोहिया यांनी केले. संचालन प्रा. किशन शिनगारे यांनी केले. आभार हनुमंत साळुंके यांनी मानले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई