संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट योग्य दिला का? डॉ. थोरात राजकीय रंग असलेले व्यक्ती; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:03 IST2025-01-27T13:58:43+5:302025-01-27T14:03:52+5:30

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Was Santosh Deshmukh's postmortem report correct? Dr. ashok Thorat a person with political color Anjali Damania's allegation | संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट योग्य दिला का? डॉ. थोरात राजकीय रंग असलेले व्यक्ती; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट योग्य दिला का? डॉ. थोरात राजकीय रंग असलेले व्यक्ती; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला. या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण, अजूनही एक मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. दरम्यान, आता एसआयटीने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशी सुरू केली आहे. रोज नवीन खुलासे समोर येत आहे. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय व्यक्त केला आहे. 

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं?

समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. दमानिया यांनी डॉ. थोरात यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. डॉ. अशोक थोरात यांनीच सरपंच संतोष देशमुख यांचे पोस्टमार्टम केले आहे. या रिपोर्टवर आता त्यांनी संशय व्यक्त केला आहे. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

डॉ. अशोक थोरात यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट योग्य दिला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. थोरात हे राजकीय रंग असणारे व्यक्ती आहेत, असा आरोपही दमानिया यांनी केला. अंजली दमानिया म्हणाल्या, डॉ. अशोक थोरात हे व्यक्ती राजकीय रंग असलेले व्यक्ती आहेत. ते मध्ये लोकसभा आणि विधानसभाही लढवणार होते. मला काल त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल कळले. ते हॉटेल बघून मला धक्काच बसला. आता या व्यक्तीने जर संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टचे रिपोर्ट दिले असतील तर त्यांनी योग्य कारवाई केली की नाही? अशी शंका मनात येते, असंही अंजली दमानिया म्हणाल्या. 

दरम्यान,आता सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी डॉ. थोरात यांनी दमानिया यांच्या संशयाचे उत्तर द्यावी अशी मागणी केली आहे. धनंजय देशमुख म्हणाले, डॉ. अशोक थोरात यांनी पोस्टमार्टम केला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने शवविच्छेदन केले आहे. त्याचे रिपोर्ट आले आहेत. आता डॉक्टरांनी यावर प्रसार माध्यामांशी बोललं पाहिजे, असंही धनंजय देशमुख म्हणाले. 

डॉ. अशोक थोरात कोण आहेत?

डॉ. अशोक थोरात हे या आधी आरोग्य मंत्री मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. पुढे त्यांची बदली नाशिकला झाली. सध्या ते बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झाले आहेत.
 

 

Web Title: Was Santosh Deshmukh's postmortem report correct? Dr. ashok Thorat a person with political color Anjali Damania's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.