Walmik Karad ( Marathi News ) :वाल्मीक कराड याच्यावर बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशीसाठी सीआयडीने कराड याला ताब्यात घेतले असून १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यभरातून कारवाईची मागणी सुरू असून आता वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. आमदार सुरेश धस आणि आता राज्यभरात १४१ हार्वेस्टर मशिनसाठी ८-८ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशिन वापरले जाते. या मशिनच्या किंमती मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे राज्य सरकारकडून या मशिनसाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान कृषी विभागामार्फत दिले जाते, या अनुदानासाठी वाल्मीक कराड याने १४१ मशिनसाठी ५,१४१ लोकांकडून जमा केल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या लोकांकडून ८-८ लाख रुपये घेतल्याचा आरोप धस यांनी केला, यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. राज्यात अनेक ठिकाणी या प्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
५,१४१ लोकांकडून पैसे घेतले
आमदार सुरेश धस म्हणाले, हार्वेस्टर मशिन १४१ द्यायचे होते. या लोकांनी ५,१४१ लोकांकडून ८-८ लाख रुपये गोळा केले आहेत. आता पहिला गुन्हा पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे. आता अशाच प्रकारचे गुन्हे कोल्हापूर, बीडमध्ये दाखल होतील. या लोकांना यांनी ४० लाख रुपयांचे अनुदान देतो म्हणून सांगितलं, यामुळे लोकांनी पैसे दिले. लोक पैसे परत मागायला आले की यांनी त्यांना मारायचे असा आरोपही आमदार सुरेश धस यांनी केला.
"लोकांना मशिनमध्ये ४० लाखाची सबसिडी देतो म्हणून सांगितले आणि लोकांना मशिनही दिले नाही आणि सबसिडी सुद्धा दिली नाही, अशा प्रकारचे उद्योग यांनी बरेच केले आहेत, असंही आमदार धुस म्हणाले.
सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा
आमदार धस म्हणाले, तुमच्या खंडणीआड आल्याने हत्या केली. तत्पूर्वी, खंडणीची तक्रार घेऊ नका म्हणून पोलिसांना आकाने फोन केले. आकालाही (वाल्मीक कराड) मोक्का लागला पाहिजे. त्याने बीडच्या महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून १० लाख खर्च करून ५ कोटी सरकारी तिजोरीतून काढून खिशात घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, असे म्हटल्याचे सांगत मुंडे दिवसा माणसे मारत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढा. तुमचे वागणे बरे नाही, असे धस म्हणाले.