सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडचा मोठा निर्णय; अचानक वकील बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:12 IST2025-03-12T10:17:41+5:302025-03-12T11:12:20+5:30

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आजपासून न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे.

Walmik Karad's big decision on the first day of the hearing Suddenly the lawyer changed | सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडचा मोठा निर्णय; अचानक वकील बदलला

सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडचा मोठा निर्णय; अचानक वकील बदलला

Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसापूर्वी आरोप पत्र दाखल केले. या प्रकरणात वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपीमध्ये नाव आहे. या प्रकरणी आज न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. दरम्यान, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्याच सुनावणी आधी वाल्मीक कराड याने आपला वकील बदलला आहे. 

मोठी बातमी! 'खोक्या' पोलिसांच्या जाळ्यात; बीडच्या सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक

आज होणाऱ्या सुनावणीसाठी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख कोर्टात उपस्थित राहणार आहेत. तर देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम लढणार आहेत. पण, आज ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

वाल्मीक कराड याने अचानक वकील बदलला

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. देशमुख यांच्याकडून आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे सरकार पक्षाकडून बाजू मांडणार आहेत. तर वाल्मीक कराड याची आजपर्यंत अशोक कवडे हे न्यायालयात बाजू मांडत होते. पण यापुढे कोल्हापूर येथील वकील एस एन खाडे हे वाल्मीक कराड याची बाजू मांडणार आहेत.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात पहिलीच सुनावणी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. आरोपीचे वकील दोषारोपपत्राबाबत मुद्दे मांडू शकतात. आरोपींना जेलमधून केजमध्ये आणण्यात येणार आहे. 

Web Title: Walmik Karad's big decision on the first day of the hearing Suddenly the lawyer changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.