लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:40 IST2019-10-10T23:40:28+5:302019-10-10T23:40:53+5:30

शहरातील एका महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तुझ्याशी माझा काही संबंध नाही, तुझी जात वेगळी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली.

Violence against a woman by showing her desire to marry | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

ठळक मुद्देशिवाजीनगर ठाण्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटीसह अत्याचार प्रकरणी गुन्हा

बीड : शहरातील एका महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तुझ्याशी माझा काही संबंध नाही, तुझी जात वेगळी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचार व अ‍ॅट्रोसिट्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक दगडू वैगुंडे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संबंधित महिलेचे यापूर्वी एक लग्न झालेले होते. त्यापासून तिला दोन अपत्ये आहेत. अशोक वैगुंडे याचा रिक्षा मुलीला शाळेत जाण्यासाठी या महिलेने लावला होता. यावेळी अशोकची व महिलेची ओळख झाली होती.
दरम्यान, २०१५ साली अशोक त्या महिलेला म्हणाला, माझ्या पत्नीशी माझा संबंध नाही. मला तू आवडतेस. तुझ्याशी लग्न करीन. तुला घर देईल असे आमिष दाखवले. या आमिषाला ती महिला बळी पडली. त्यानंतर ते दोघेही एकत्र राहू लागले. यावेळी अशोकपासून पीडितेला एक मुलगीही झाली. त्यानंतर आपण लग्न कधी करायचे, असे पीडितेने वारंवार विचारल्यानंतर तुझी जात वेगळी आहे, तू खालच्या जातीची आहेस, यापुढे तू मला भेटू नकोस असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच २५ सप्टेंबर रोजी मारहाण करुन अत्याचार केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अशोक वैगुंडेविरुद्ध पीडितेच्या फिर्यादीवरुन अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत हे करीत आहेत.

Web Title: Violence against a woman by showing her desire to marry