शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गावपातळीवर सर्वेक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:11 IST

जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा प्रशासनानेच कळविले विमा कंपनीला : ७२ तासांच्या अटीबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पंचनाम्याचे काम झाले सुरू

बीड : जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा कंपनीकडून तालुकास्तरावर नियुक्त केलेले कर्मचारी अपुरे असल्यामुळे शेतक-यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गाव पातळीवरील कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, प्रविण धरमकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर, विमा कंपनीचे प्रतिनिधी अमित गौडा यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना पाण्डेय म्हणाले, गाव पातळीवरील पिक विमाबाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांची समिती सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार असून या अहवालाच्या आधारे पिक विमा नुकसानीचे माहिती जिल्हा प्रशासनामार्फत विमा कंपनीस दिली जाईल, असे त्यांनी सांगीतले.प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील पीक कापणी करून सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेल्या पिकांसाठी तसेच सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे नुकसान झालेल्या पात्र शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी तालुका कृषी अधिकाºयांकडे गर्दी होत आहे. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक देखील बंद असल्याने अडचणीचे ठरत आहे.यामुळे गाव पातळीवर अर्ज स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांची अडचण दूर झाली आहे.शेतक-यांनी काळजी करू नयेपिक विमा अर्जासोबतच राज्य शासनाकडून मिळणाºया नुकसान भरपाई मदतीसाठी देखील पंचनामे करण्यात येणार असून, त्याची माहिती राज्य शासनाकडे स्वतंत्ररित्या सादर केली जाईल यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टीसाठी मिळणाºया नुकसान भरपाईचा लाभ देखील मिळू शकेल यामुळे शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करु नये व काळजी करू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdroughtदुष्काळ