शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दादाहरी वडगाव बचावसाठी ग्रामस्थ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

प्रदूषणाविरुद्ध दिला नारा : शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन, थर्मल अधिकाऱ्यांविषयी असंतोष लोकमत न्यूज नेटवर्क परळी : येथील औष्णिक विद्युत ...

प्रदूषणाविरुद्ध दिला नारा : शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन, थर्मल अधिकाऱ्यांविषयी असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दादाहरी वडगाव व दाऊतपूर शिवारातील तळ्यामधील राख व राखसाठ्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे आता प्रदूषण हटाव आणि दादाहरी वडगाव बचाव या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव, दाऊतपूर शिवारात थर्मलचे राख तळे असून, या तळ्यातून दररोज शेकडो टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक परळी-गंगाखेड रस्त्यावरील दुचाकीसह सर्वच वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. विशेष म्हणजे दादाहरी वडगाव येथील साडेतीन हजार ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा गेल्या अनेक वर्षांपासून त्रास होत आहे. ग्रामस्थांना डोळ्यांचे व फुफ्फुसाचे आजार होत आहेत. गेल्या पाच वर्षात श्वसनाचे गंभीर आजार जडलेले रुग्ण वाढले आहेत.

परळी विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याकडून कसलीही ठोस कारवाई केली जात नसल्याने राखेची परळी व परिसरातून वाहतूक सुरूच आहे. राख तळ्यातून होणारी राखेची वाहतूक बंद करावी व दादाहरी वडगाव, दाऊतपूर शिवारातील राखेचे साठे नष्ट करावेत आणि प्रदूषणमुक्त गाव करावे, या मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी परळी-गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगावजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे तसा इशारा दिला आहे.

दादाहरी वडगावचे ग्रामस्थ राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. आरोग्यावरही परिणाम होत आहे. परंतु, या भागातील लोकप्रतिनिधी व औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

- शिवाजी शिंदे, माजी सरपंच, दादाहरी वडगाव.

औष्णिक विद्युत केंद्राच्या राख प्रदूषणामुळे व सिमेंट कंपनीमुळे परळी शहर व परिसरातील नागरिकांच्या शरिरावर तर परिणाम होतच आहे. शिवाय मुखरोग, छातीचे विकार होत आहेत. महिलांनाही प्रदूषणाचा त्रास होत आहे. या प्रश्नी राख प्रदूषण नियंत्रण समितीने सुरू केलेल्या चळवळीत प्रत्येक नागरिकांने सहभागी व्हावे.

- डॉ. मनोज मुंडे, दंत चिकित्सक

परळी तालुक्यातील दाऊतपूर, वडगाव येथून वाहतूक होणाऱ्या राखेच्या वाहनांवर तीन दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. ज्याठिकाणी राख साठे असतील ते साठे उद्ध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील.

- शिवलाल पुरभे, पोलीस निरीक्षक, परळी ग्रामीण

राखेच्या प्रदूषणासंदर्भात परळी विद्युत केंद्र व ग्रामीण पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

-

बाबूराव रुपनर, नायब तहसीलदार, परळी