गावोगावी ऑक्सिजन पार्कची निर्मिती व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST2021-05-31T04:25:13+5:302021-05-31T04:25:13+5:30
अंबाजोगाई : वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनातून गावोगावी ऑक्सिजन पार्कची निर्मिती व्हावी, असे आवाहन अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर ...

गावोगावी ऑक्सिजन पार्कची निर्मिती व्हावी
अंबाजोगाई : वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनातून गावोगावी ऑक्सिजन पार्कची निर्मिती व्हावी, असे आवाहन अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी केले.
वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाविषयी अंबाजोगाई येथे शनिवारी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर होत्या. यावेळी कार्यक्षेत्रातील सहा तालुक्यातील वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, वृक्षप्रेमी व शिक्षक उपस्थित होते.
आगामी हंगामातील वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाचे
नियोजन यावेळी करण्यात आले. सुरुवातीला मंजुषा मिसकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार अटल घनवृक्ष लागवड, देवराई वृक्ष लागवड, सार्वजनिक विहिरींच्या ठिकाणी वृक्ष लागवड, बांधावरील वृक्ष लागवड, शेतातील वृक्ष लागवड, नदी, कालवे यांच्या काठावरील वृक्ष लागवड करण्याविषयी माहिती देण्यात आली. या अभियानाचा प्रारंभ ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवसापासून करण्यात येणार आहे.
शनिवारी येथील अपर जिल्हाधिकारी मिसकर यांनी तालुक्यातील भारत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. तेथील अटल घनवन वृक्ष लागवडीची पाहणी केली.
याप्रसंगी मिसकर यांच्या हस्ते शाळेच्या परिसरातील अटल घन वन येथे मधु मालती या वृक्षाचे रोपण करण्यात आले. मुख्याध्यापक राजेसाहेब किर्दंत यांनी मिसकर यांना चाफ्याचे रोप भेट दिले. यावेळी गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी उपस्थित होते.
===Photopath===
300521\avinash mudegaonkar_img-20210529-wa0038_14.jpg
===Caption===
अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अटल घन वन येथे वृक्षारोपण करण्यात आले.