परळीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:27 IST2019-05-06T17:24:45+5:302019-05-06T17:27:36+5:30
मिलिंद नगर व जुना रेल्वे स्टेशन या भागात गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे.

परळीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण
परळी (बीड ) : शहरातील मिलिंद नगर, जुने रेल्वे स्टेशन भागातील नागरिकांनी सोमवारपासून पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मिलिंद नगर व जुना रेल्वे स्टेशन या भागात गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या भागातील काही नागरिक पाण्याविना त्रस्त झाले आहेत. उपोषणार्थी शेख अफसर म्हणाले की, परळी नगरपरिषदकडे पिण्याच्या पाण्याची सोय करावी यासंदर्भात अनेक वेळा पत्र देऊन पाठपुरावा केला, तरीही पाणीपुरवठा विभागाने दखल घेतली नाही. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. उपोषण स्थळी जाकेरसय्यद, शेख इमाम, अरुण सरवदे, अमोल नाईकवाडे, शेख अनिस, अब्दुल काकर, असलम शेख, अफजल पठाण इब्राहिमा, दत्तात्रय कुलकर्णी आदींचा सहभाग आहे.