महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 19:06 IST2022-12-29T19:02:53+5:302022-12-29T19:06:39+5:30

महानंदच्या १७ संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.

Unopposed election of Prajakta Dhas as Director of Mahanand Milk Federation | महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड

महानंद दूध महासंघाच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड

कडा (बीड) : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित अर्थात महानंदच्या संचालकपदी प्राजक्ता धस यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्या आ. सुरेश धस यांच्या पत्नी आहेत. 

महानंदच्या १७ संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, महिला राखीव मतदारसंघाच्या दोन जागांसाठी केवळ दोनच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. यामुळे संचालकपदी आष्टी तालुका सहकारी दुध संघाच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस व कात्रज दुध संघाच्या चेअरमन केशरबाई सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे जेष्ठ नेते आ.हरिभाऊ बागडे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रयत्नाने ही निवडणूक बिनविरोध झाली. प्राजक्ता धस यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.

Web Title: Unopposed election of Prajakta Dhas as Director of Mahanand Milk Federation