परळीत कार्टून दाखविण्याच्या आमिषाने दोन बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:06 IST2018-12-22T18:05:52+5:302018-12-22T18:06:14+5:30
न्यायालयाने आरोपीस 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

परळीत कार्टून दाखविण्याच्या आमिषाने दोन बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य
परळी (बीड ) : कन्हेरवाडी येथे मोबाईलमधील कार्टून दाखवण्याचे व पैस्याचे आमिष दाखवून ३ वर्षाच्या चिमुकलीवर व 5 वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बाबासाहेब ज्ञानोबा चौरे (वय १९) या आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी बाबासाहेब ज्ञानोबा चौरे याने शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलमधील कार्टून दाखवतो म्हणून घरात नेले. त्यानंतर चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्य केले. तसेच एका पाच वर्षांच्या मुला सोबतही पैस्याचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य केले. घटना उघडकीस येताच चौरे याच्या विरोधात पालकांनी तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली.