‘संघटनेच्या एकजुटीमुळे प्रश्न मार्गी लागणे सोपे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:34+5:302021-02-06T05:02:34+5:30
किल्लेधारूर : संघटनेची ताकद सर्व बाजूने वाढविण्यासाठी एकजुटीने प्रत्येक सभासदाने प्रयत्न केले पाहिजेत. संघटनेच्या एकजुटीमुळे प्रश्न मार्गी लागणे ...

‘संघटनेच्या एकजुटीमुळे प्रश्न मार्गी लागणे सोपे’
किल्लेधारूर : संघटनेची ताकद सर्व बाजूने वाढविण्यासाठी एकजुटीने प्रत्येक सभासदाने प्रयत्न केले पाहिजेत. संघटनेच्या एकजुटीमुळे प्रश्न मार्गी लागणे सोपे होते व कामगारांना न्याय मिळतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या तालुकास्तरीय चौथ्या त्रेवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे यानी केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस कॉ. डॉ. अशोक थोरात, कॉ. मीरा शिंदे, कॉ भागवत जाधव, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मोहन लांब, कॉ. मनिषा करपे उपस्थित होते. यावेळी बोलताना किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काॕॅ. मोहन लांब यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून सिटू प्रणित संघटना या विचाराने प्रेरित होऊन काम करतात. या संघटनांकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन चांगला असून, या संघटनांच्या कार्याचा प्रशासनावर दबदबा आहे. प्रभाकर नागरगोजे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना संघटनेच्या कार्याची दिशा व धोरण सांगून कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेमार्फत सतत प्रयत्न केले जात आहेत. कामगारांचा मानधनवाढीचा प्रश्न प्राधान्याने शासनाकडे लावून धरला जाणार आहे, असे सांगितले. यावेळी मोहन लांब, डाॕॅ. अशोक थोरात, मीरा शिंदे, मनिषा करपे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला कामगारांनी आपल्या भावना मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळराजे सोळंके यांनी केले. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष कॉ. लक्ष्मण डोंगरे, उपाध्यक्ष सुनीता डोईफोडे, महादेव गायकवाड, कार्याध्यक्ष वैशाली आरसुळ, सचिव -कॉ. लता खेपकर, सहसचिव संगीता थोरात, जयश्री सोळंके, सल्लागार शोभा सोळंके आदींनी परिश्रम घेतले.