दुर्दैवी ! घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:26 IST2021-05-23T11:25:05+5:302021-05-23T11:26:06+5:30

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील घटना

Unfortunately! Mother-Daughter death due to electric shock in the house | दुर्दैवी ! घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू

दुर्दैवी ! घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू

माजलगाव : तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शशिकलाबाई शंकरराव फपाळ (65) व सखुबाई फपाळ (45) असे मृत मायलेकीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ या मुलगी सखुबाई सोबत राहत. रविवारी सकाळी ६ वाजता झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला असता त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यावेळी मुलगी सखुबाई आईला काय झाले हे पाहण्यासाठी गेली असता तिलादेखील तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यात दोघी मायलेकी हिरपळून जागीच ठार झाल्या.

दरम्यान, पाटील गल्ली येथे मागील आठ दिवसांपासून अनेक घरात विद्युत प्रवाह उतरला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महावितरणकडे केल्या होत्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केले. यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Unfortunately! Mother-Daughter death due to electric shock in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.