दुर्दैवी! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले; उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:16 IST2023-03-23T13:14:45+5:302023-03-23T13:16:10+5:30
अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज पहाटे झाला मृत्यू

दुर्दैवी! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले; उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
कडा (बीड) - कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराच्या धक्का आल्याने पोलीस उपनिरीक्षकास उपचारासाठी अहमदनगर येथे उपचारासाठी बुधवारी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी नागरगोजे ( ५७ ) असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात शिवाजी नागरगोजे हे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. बुधवारी कर्तव्यावर असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सायंकाळी त्याने अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. नागरगोजे हे तालुक्यातील दादेगांव येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.