दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; दोन तरुण ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:23 PM2021-02-22T12:23:45+5:302021-02-22T12:24:20+5:30

माजलगाव शहराजवळील केसापुरी कँम्पजवळील घटना

Two-wheeler hits tractor trolley; Two young people killed, one injured | दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; दोन तरुण ठार, एक जखमी

दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; दोन तरुण ठार, एक जखमी

Next

माजलगाव : गेवराई रोडवर शहरापासूनजवळ असलेल्या केसापुरी कॅम्प येथे  रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. तर एक तरुण गंभीर जखमी आहे. 

शहरात आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्यानंतर रात्री ९ वाजेच्या दरम्यान तिघे तरुण दुचाकीवरून केसापुरी कॅम्पकडे जात होते. यावेळी रस्त्यात उसाने भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉलीला उभी होती. अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रॉलीवर जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील रविराज रामहरी शेंडगे ( २०, रा.उमरी ) आणि विवेक भागवत मायकर (२१, पिंपळगाव-नाकले ) या दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर ओंकार काळे हा तिसरा तरुण गंभीर जखमी आहे. त्याला अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler hits tractor trolley; Two young people killed, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.