सिरसाळ्यात टिप्पर अंगावरून गेल्याने दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 11:16 IST2019-04-12T11:15:09+5:302019-04-12T11:16:20+5:30
दोघेही वीटभट्टीजवळ रात्री झोपले होते

सिरसाळ्यात टिप्पर अंगावरून गेल्याने दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार
बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका विटभट्टीच्या ठिकाणी रात्री भट्टी जवळ झोपलेल्या दोन मुलांच्या अंगावरून टिप्पर गेल्याने ते दोघे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनूसार अजय बनसोडे (२१), अशोक मस्के (१८ रा.मांडखेल ता.परळी) अशी मयत मुलांची नावे आहेत. हे दोघेही सिरसाळा येथील विटभट्टीवर कामगार आहेत. शुक्रवारी दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते राखेच्या ढिगाऱ्यावर झोपले होते. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास १० चाकी हायवा टिप्पर माती घेऊन आले. त्यांना या मुलाबद्दल काहीच माहिती नव्हती. या चालकाने भरधाव टिप्पर त्यांच्या अंगावर घातले. हे टिप्पर डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कामगार व पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अद्याप या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.