आष्टी तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू; एक बैलजोडही दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 21:23 IST2023-04-19T21:23:13+5:302023-04-19T21:23:39+5:30

केरुळ, सांगवी आष्टी येथील घटनेत दोन महिलांचा मृत्यू

Two farmer women killed by lightning in Ashti taluka; A pair of bullocks was also killed | आष्टी तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू; एक बैलजोडही दगावली

आष्टी तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू; एक बैलजोडही दगावली

- नितीन कांबळे 
कडा - आष्टी तालुक्यातील केरुळ आणि सावंगी आष्टी येथे वीज कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. काजल विकास माळी (२३, रा.केरुळ ) आणि राणी (ताई) संदीपान सावंत (३५, रा.सांगवी आष्टी)  असे मृत महिलांचे नाव आहे. यासोबतच पारगाव जो. येथे देखील वीज कोसळून युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी मृतुमुखी पडली.

आष्टी तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान,   सायंकाळी सहा वाजेदरम्यान केरुळ येथे शेळ्या चारत असलेल्या काजल विकास माळी यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सांगवी आष्टी येथील राणी (ताई) संदीपान सावंत या माहेरी हिंगणी येथील शेतात काम करताना अंगावर वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्या. यासोबतच पारगाव जो. येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी देखील जागीच मृत झाली आहे.

पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांनो काळजी घ्या
 पुढील दोन दिवस पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खाते व पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. या कालावधीत आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत, तसेच शेतामध्ये काम करताना पावसाचे चिन्ह दिसताच सुरक्षित ठिकाणी जावे.
- आ.सुरेश धस 

Web Title: Two farmer women killed by lightning in Ashti taluka; A pair of bullocks was also killed