महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे माजलगाव तालुक्यात दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 19:03 IST2018-07-18T19:01:02+5:302018-07-18T19:03:56+5:30
तालुक्यातील लऊळ येथे शेतात विद्युत प्रवाह उतरल्याने एक शेतकरी व राजेवाडी येथे विद्युत तर अंगावर पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे माजलगाव तालुक्यात दोघांचा बळी
माजलगाव (बीड) : तालुक्यातील लऊळ येथे शेतात विद्युत प्रवाह उतरल्याने एक शेतकरी व राजेवाडी येथे विद्युत तर अंगावर पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
लऊळ येथील शेतकरी विनायक सोमनाथ शिंदे हे आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान आपल्या शेतात खत देण्यासाठी गेले होते. यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत खांबातून त्यांच्या शेतात विद्युत प्रवाह उतरला. त्याचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या एका घटनेत राजेवाडी येथील ऊसतोड कामगाराची चार वर्षीय मुलगी प्रतीक्षा चत्रभुज काळे ही चिमुकली आज दुपारी अंगणात खेळत होती. यावेळी तेथून गेलेली विद्युत तार तिच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही दुर्दैवी घटना महावितरण विद्युत कंपनीच्या गलथान कारभाराचा बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.