Two bike thief arrested in Gevrai area; Seven wheels seized | गेवराई परिसरातून दोन अट्टल दुचाकी चोर अटकेत; सात दुचाकी जप्त
गेवराई परिसरातून दोन अट्टल दुचाकी चोर अटकेत; सात दुचाकी जप्त

बीड : स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री एका कारवाई दरम्यान दोन अट्टल गुन्हेगारांना गेवराई परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात चोरीच्या दुचाकीसुद्धा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. देवीदास लखन पवार, बाळू उर्फ प्रेम मैंदर ( दोघेही रा.जतेगाव ता.गेवराई) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. 

जिल्हातील परळीसह इतर तालुके आणि परजिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दोन्ही चोरट्यांनी दिली आहे. पोलीस अधिक तपास करत असून दुचाकी चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक भरत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोसावी, पोह. जयसिंग वाघ, तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, पोना.कैलास ठोंबरे, विकास वाघमारे, सतीश कातखडे, चालक हारके यांनी केली.

Web Title: Two bike thief arrested in Gevrai area; Seven wheels seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.