जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:11 IST2025-05-16T12:00:49+5:302025-05-16T12:11:53+5:30
बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहे. ९६ टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगलीच चर्चा होत आहे.

जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (१३ मे) रोजी जाहीर झाला. या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. बीडमध्ये जुळ्या बहिणींनाही समे टू सेम गुण मिळाले आहेत.
बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहे. ९६ टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगलीच चर्चा होत आहे.
आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोघी जुळ्या बहिणी आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणाच्या बाबतीत अनेक बातम्या ऐकल्या असतील. मात्र आता जुळ्या बहिणींनी जुळे गुण मिळाल्याचे समोर आले आहे.
आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या धीरज देशपांडे यांच्या दोन जुळ्या मुलींनी कमाल केली. विशेष म्हणजे दोघींना नृत्याची आवड आहे. त्यामध्ये दोघी हुबेहूब नृत्य करतात. दहावीला सोबत अभ्यास केला शाळेतही सोबत जायच्या. पण वाटलं नव्हतं दोघींना एक सारखेच गुण पडतील. निकाल लागल्यानंतर खूप आनंद झाला. आम्ही दोघी एकमेकींच्या शंका निरसन करायचं त्यामुळेच चांगले गुण पडले असं अनुष्का हिने सांगितले. आई-वडिलांनी आनंद व्यक्त करत दोन्ही गुणी लेकींचे औक्षण करून शाब्बासकी दिली.
दहावीचा निकाल ९४.१० टक्के
या वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे.
या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.