खडकळी तलावाकाठी बारा पक्षी मृत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST2021-01-16T04:38:10+5:302021-01-16T04:38:10+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील केरूळपासूनचजवळ असलेल्या खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी बारा पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

खडकळी तलावाकाठी बारा पक्षी मृत आढळले
कडा : आष्टी तालुक्यातील केरूळपासूनचजवळ असलेल्या खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी बारा पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पशुसंर्वधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पक्ष्यांना अळ्यांनी खाल्ल्याने नमुने तपासणीसाठी घेता आले नसल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे अनेक कावळ्याचा बर्ड फ्युने मृत्यू झाले. त्यानंतर आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही दोन कावळे तर शिरापूर येथे साडेचारशे कोंबड्या दगावल्या. आता अचानक बारा पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने हे पक्षी नेमके मृत कशाने झाले असावेत याचे निदान होऊ शकले नाही. पक्षी दोन दिवसअगोदर मृत झाले असावेत अळ्यांनी खाल्ले असल्याने नमुने पाठवण्यासाठी घेता आले नसल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. ढेरे यांनी सांगितले.