हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:43 IST2019-05-16T00:43:19+5:302019-05-16T00:43:43+5:30
जमिनीचा फेरफार आॅनलाईन केल्यानंतर बक्षीस म्हणून हजार रुपयांची लाच घेताना हिंगणगाव सजाच्या तलाठ्यास पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी गेवराई शहरात पकडले.

हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : जमिनीचा फेरफार आॅनलाईन केल्यानंतर बक्षीस म्हणून हजार रुपयांची लाच घेताना हिंगणगाव सजाच्या तलाठ्यास पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी गेवराई शहरात पकडले.
हरिदास नामदेव काकडे (वय ४४) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. काकडे याने तक्रारदाराच्या जमिनीचा फेरफार आॅनलाईन करून दिला होता.
त्याबदल्यात काकडे बक्षिस म्हणून हजार रूपयांची मागणी करीत होता. त्यानंतर ही तक्रार बीडच्या एसीबीकडे आली. १३ मे रोजी एसीबीने खात्री केली. १५ मे रोजी गेवराई येथे सापळा लावला.
हजार रुपये स्वीकारताच बाजुला दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झडप घालून त्याला पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.