जीपच्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:24 IST2020-03-12T23:23:28+5:302020-03-12T23:24:12+5:30
जालना येथून सळ्या घेऊन जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील ट्रक चालकाला जीपने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

जीपच्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू
बीड : जालना येथून सळ्या घेऊन जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील ट्रक चालकाला जीपने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान घडली.
क्षमलिंग हनुमंतराव कुलकर्णी (३७, रा. कोटनूर, ता. जि. कलबुर्गी, कर्नाटक) हा ट्रक ड्रायव्हर जालना येथून लोखंडी सळ्यांचा ट्रक (एपी २४ डब्ल्यु ३९८७) घेऊन धुळे - सोलापूर महामार्गावरुन जात होता. बीड तालुक्यातील पेंडगावजवळ मध्यरात्री २ वाजता कुलकर्णी हे खाली उतरले. ट्रकचे टायर तपासताना पाठीमागून औरंगाबादकडे येणाºया भरधाव जीप (एमएच २६ एएफ ५३३३) ने त्यांना जोराची धडक दिली. यात कुलकर्णी पाय गुडघ्यापासून तुटून बाजूला पडला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी बीड ग्रामीण ठाण्यास माहिती दिली. त्यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला.
धडक दिल्यानंतर चालक जीपसह फरार झाला. परिसरातील नागरिकांनी जीपचा क्रमांक पाहिलेला असल्याने त्यांच्या खबरीवरुन पोलिसांनी जीप चालकाविरुद्ध मयताचे चुलते चंद्रशेखर अण्णाराव कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास उध्दव जरे हे करीत आहेत.