शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

ट्रक-कारची धडक; चार वºहाडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:11 AM

ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील घटना : मयत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील

बीड : ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तरुणाच्या लग्नासाठी हे सर्व कपिलधारला आले होते. मृतात नवरदेवाच्या भावाचाही समावेश आहे. मयत हे बीडसह लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशीआहेत.अक्षय उर्फ आकाश रामलिंग गाढवे (३० रा. धानोरा, ता. अंबाजोगाई), सौरभ अरुण लोहारे (२२ रा. लातूर), ३) तेजस सुभाष गुजर (३२ रा. अंबाजोगाई), ४) मंगेश मल्लिकार्जुन कुंकुकरी (बार्शी जि. सोलापूर) अशी मयतांची नावे असून शुभम दत्तात्रय उंब्रे (रा. वानेवाडी ता. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी आहेत. शुभम वगळता उर्वरित सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तेजस गुजरच्या भावाचे रविवारी कपिलधार येथे लग्न असल्याने हे सर्व तिकडे गेलेले होते. काही कामानिमित्त हे पाच तरुण बीडला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते पुन्हा कपीलधारच्या दिशेने जात होते. याचवेळी पाली जवळ मांजरसुंब्याकडून येणाऱ्या ट्रकची (एमएच ०९ सीए ०५९२) आणि कारची (एमएच ०२ एके २१११) समोरासमोर धडक झाली. यामध्ये कार ट्रकखाली आल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला. दोघे जण जागीच ठार झाले.अन्य जखमी दोघांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी शुभमवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, अपघाताची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ, महामार्गचे पोउपनि भास्कर नवले, भागवत शेलार, जयसिंग वाघ यांच्यासह कर्मचाºयांनी धाव घेतली. पंचनामा करून वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. तोपर्यंत बघ्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.बँडबाजा ऐवजी आक्रोश आणि हुंदकेतेजसचा भाऊ कुंभेश यांचे रविवारी कपिलधार येथे दुपारच्यावेळी लग्न होते. बँडबाजाच्या आवाजात सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने लग्नकार्यात गुंतले होते. त्याचवेळी अपघातात लग्नघरातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी वार्ता आली आणि क्षणात सर्व परिसर आक्रोश आणि हुंदक्यांनी भरून गेला.त्यानंतर कुंभेश यांनी रुग्णालयात धाव घेतली असता भाऊ तेजस, मामेभाऊ अक्षय, मेहुणे सौरभ आणि मंगेश यांचे मृतदेह पाहून त्यांनाही भोवळ आली. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी लगोलग त्यांच्यावर उपचार केले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू