वाघळूज घाटात भीषण अपघात, एक जागीच ठार,चार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 08:17 IST2021-09-15T08:14:14+5:302021-09-15T08:17:13+5:30
Accident at Beed : वाघळूज घाटातील वळणावर झाला भीषण अपघात

वाघळूज घाटात भीषण अपघात, एक जागीच ठार,चार गंभीर जखमी
कडा( बीड) : भरधाव कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे नगर-बीड मार्गादरम्यानच्या वाघळूज घाटात झाला.
भरधाव वेगाने नगरकडे जाणारी कार आणि नगरहून कड्याकडे येणारी पिकअप यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की,कारचा चक्काचूर झाला आहे. यात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर पिकअपमधील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेत मृत झालेला डॉक्टर असुन तो कुठला नाव काय हे समजले नाही.
अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नगर येथे उपचारासाठी हलविले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील बीड ते नगर दरम्यान रोज कुठे ना कुठे अपघात होतात. धोकादायक वळण व घाटात कसलीच उपाययोजना संबंधित विभागाने केली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढते आहे.