आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:45 IST2019-09-18T00:44:59+5:302019-09-18T00:45:16+5:30
बलभीम चौकातील एका पुस्तक विक्रीच्या दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली.

आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील बलभीम चौकातील एका पुस्तक विक्रीच्या दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान व्यवसायासाठी घेतलेले व्याजाच्या पैशाचा बोजा वाढल्याने या व्यापा-याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
भारत महादेव काळे (वय ३२ रा.नेहरू नगर, कबाड गल्ली बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यापा-याचे नाव आहे. त्यांचे बीड शहरातील बलभीम चौकात पुस्तकाचे दुकान आहे. त्यांनी सोमवारी दुकानातील पंख्यालाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर पवार, पोना अशोक दराडे, रामदार तांदळे, अविनाश सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. भारत काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.