ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:04 IST2018-10-21T00:04:38+5:302018-10-21T00:04:55+5:30
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चंद्रशेखर गोपीनाथ बडे (४०) व अमोल चंद्रेशखर बडे (१२ रा.खामगाव ता.परळी) हे बापलेक ठार झाले. तर संजय चंद्रशेखर बडे हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सिरसाळा शिवारात घडली.

ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चंद्रशेखर गोपीनाथ बडे (४०) व अमोल चंद्रेशखर बडे (१२ रा.खामगाव ता.परळी) हे बापलेक ठार झाले. तर संजय चंद्रशेखर बडे हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सिरसाळा शिवारात घडली.
शुक्रवारी सायंकाळी ते दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. सिरसाळा शिवारात भरधाव ट्रॅक्टरने (एमएच ४४ डी १९८६) धडक दिली. यामध्ये चंद्रशेखर बडे जागीच ठार तर अमोल व संजय ही मुले गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले. अमोलचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. संजयची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरूच आहेत. गोपीनाथ बडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.