काळ्या बाजारात जाणारा ट्रॅक्टर ५५ क्विंटल गव्हासह पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:32 IST2018-09-27T00:32:09+5:302018-09-27T00:32:53+5:30
तालुक्यातील उमरी (बु) येथील स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ५५ क्विंटल (१११ कट्टे) गहू काळ्या बाजारात नेला जात होता. ही माहिती पोेलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. मंगळवारी शहरातील बायपास रोडवर ट्रॅक्टर (एमएच ४४-५४३) येताच तो अडविण्यात आला.

काळ्या बाजारात जाणारा ट्रॅक्टर ५५ क्विंटल गव्हासह पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील उमरी (बु) येथील स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ५५ क्विंटल (१११ कट्टे) गहू काळ्या बाजारात नेला जात होता. ही माहिती पोेलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. मंगळवारी शहरातील बायपास रोडवर ट्रॅक्टर (एमएच ४४-५४३) येताच तो अडविण्यात आला.
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, शरद पवार, तनपुरे, राऊत व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली.
गव्हासह ट्रॅक्टर तसेच मालक आसाराम धायतडक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.