नगर-कडा रेल्वेमार्ग चाचणी लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:19 IST2019-01-17T00:18:51+5:302019-01-17T00:19:46+5:30
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामाची बुधवारी अचानक पाहणी केली.

नगर-कडा रेल्वेमार्ग चाचणी लवकरच
कडा : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामाची बुधवारी अचानक पाहणी केली. मुख्यमंत्री ग्राम सडक व इतर विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यासाठी त्या कडा येथे आल्या होत्या. कार्यक्रमस्थळापासून जवळच रेल्वे मार्गाचे काम सुरू होते. त्यांनी अचानक आपला मोर्चा तिकडे वळवला आणि कामाची पाहणी केली. रेल्वेमार्गाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आहे. लवकरच नगर ते कडा रेल्वे चाचणी होणार आहे. रेल्वे विभागाकडून चाचणीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस हे उपस्थित होते.