ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! मित्रांची दुचाकी घसरली; टँकर अंगावर गेला, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:19 IST2026-01-19T17:18:52+5:302026-01-19T17:19:24+5:30

ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! केजच्या शिवाजीनगर भागात शोककळा; तरुणाच्या निधनाने सर्वत्र हळहळ

Thrilling! A young man died after a tanker ran over him while overtaking a two-wheeler; one was injured | ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! मित्रांची दुचाकी घसरली; टँकर अंगावर गेला, एकाचा मृत्यू

ओव्हरटेकची एक चूक अन् घात झाला! मित्रांची दुचाकी घसरली; टँकर अंगावर गेला, एकाचा मृत्यू

केज (जि. बीड) : दुचाकीवरून दोन तरुण माजलगावकडे जाताना पात्रुड शिवारात एका टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात टँकरखाली चिरडून बळीराम मस्के (वय ३५, रा. शिवाजीनगर, केज) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मित्रही जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडला.

केज येथील बळीराम प्रभाकर मस्के हा तरुण दुचाकी (एमएच ४४ एफ ११३१) वरून बाभळगाव येथील मित्र संजय लाटे याला सोबत घेऊन शनिवारी तेलगाव मार्गे माजलगावकडे निघाला होता. पात्रुड शिवारात समोरच्या टँकर (एमएच ४३ यु ७६१०) ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून बळीराम मस्के रस्त्यावर पडला. यावेळी भरधाव वेगातील टँकर त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबतचा मित्र संजय लाटे (३०, रा. बाभळगाव) हा जखमी झाला आहे. जखमीला माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार केले जात आहेत. या अपघातप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती जमादार संतोष जातेवाड यांनी दिली.

केजच्या क्रांतीनगर भागात अंत्यसंस्कार
केजच्या शिवाजीनगर भागातील बळीराम मस्के याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यांनतर त्याचे पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. केज येथील क्रांतीनगर स्मशानभूमीत पार्थिवावर रविवारी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. बळीराम मस्केच्या पश्चात आई, आणि चार बहिणी असा परिवार आहे.

Web Title : ओवरटेक करने की भूल पड़ी भारी: टैंकर ने बाइक सवार को कुचला, एक की मौत

Web Summary : केज, बीड के पास ओवरटेक करते समय टैंकर से कुचलकर एक बाइक सवार की मौत हो गई। उसका दोस्त घायल हो गया। दुर्घटना उस समय हुई जब ओवरटेक करते समय उनकी बाइक फिसल गई। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Overtaking Error Proves Fatal: Tanker Crushes Biker, One Dead

Web Summary : Near Kej, Beed, a biker died after being crushed by a tanker while attempting to overtake. His friend was injured. The accident occurred when their bike skidded during the overtaking maneuver. Police are investigating.