मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 17:10 IST2023-10-26T17:10:13+5:302023-10-26T17:10:42+5:30
गेवराई तालुक्यात मादळमोही येथील आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन
गेवराई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र सरसकट देण्याच्या मागणीसाठी गावागावांत आंदोलन सुरू आहेत. तालुक्यातील कुंभारवाडी येथील तीन युवकांनी मादळमोही येथील ग्रामपंचायत कार्यालयारील बीएसएनएल टॉवरवर चढून आज सकाळी ११ वाजता आंदोलन केले.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटिल हे दोन दिवसापासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या आंदोलनास तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुंभारवाडी येथील तीन युवक मादळमोही येथे दाखल झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयावरील टॉवरवर चढत त्यांनी आंदोलन सुरू केले. एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशा घोषणा देत त्यांनी आंदोलन केले.