Three robbers arrested by Citizens' vigilance in Kaij | केजमध्ये नागरिकांच्या सतर्कतेने तीन दरोडेखोर जेरबंद
केजमध्ये नागरिकांच्या सतर्कतेने तीन दरोडेखोर जेरबंद

ठळक मुद्दे दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार

केज : कळंब रस्त्यावरील पापालाल लोहीया दुकानामागे दरोडेखोर दबा धरून बसल्याची माहिती नागरिकांनी गुरुवारी रात्री १.३० वाजेच्या दरम्यान केज पोलिसांना दिली. यानंतर तत्काळ कारवाई करत पोलिसांनी तीन दरोडेखोरांना जेरबंद केले. तर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ट्रक व काही सामान जप्त केले आहे. 

गुरुवारी मध्यरात्री पापालाल लोहीया यांच्या लोखंडी साहित्य मिळण्याच्या दुकानामागे पाच दरोडेखोर दडुन बसल्याचे या भागातील नागरिकांना निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम  चोबे यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस ठाण्याचे फौजदार विलास जाधव व चालक कादरी,मंदे,दोन होमगार्ड घटनास्थळी पाठवले. यानंतर पोलिसांनी पाठलाग करून तीन दरोडेखोर जेरबंद केले. तर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. संजय राजेंद्र काळे, शंकर सुरेश काळे,शामसुंदर बिभीषण काळे,रुपश रविंद्र काळे ( सर्व रा.मस्सा खंडेश्वरी ता.कळंब जि.उस्मानाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. यावेळी पोलिसांनी एक ट्रक ( क्र.एम.एच.१३ एक्स.३८९७ ), लोखंडी रॉड,धारदार शस्त्र आदी जप्त केले. 

Web Title: Three robbers arrested by Citizens' vigilance in Kaij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.