तृतीयपंथीयाच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर तिघांचा बलात्कार; परळी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:48 IST2025-08-11T15:44:32+5:302025-08-11T15:48:17+5:30

याप्रकरणी तृतीयपंथीयासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Three men rape migrant girl with the help of a third-party; incident in Parli taluka | तृतीयपंथीयाच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर तिघांचा बलात्कार; परळी तालुक्यातील घटना

तृतीयपंथीयाच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर तिघांचा बलात्कार; परळी तालुक्यातील घटना

अंबाजोगाई : काम देण्याचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीयाने परप्रांतीय २० वर्षीय तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केले आणि तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा शिवारात शनिवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी तृतीयपंथीयासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेतील पीडिता मूळची हैदराबाद येथील असून, मुंबईत घरगुती साफसफाईच्या कामावर होती. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेने निघाली होती. भूक लागल्याने ती परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावर पडली. पूजाने बोलत बोलत तिची गरज जाणून घेतली आणि काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले.

त्यानंतर ते तिघे पीडितेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये नेऊन जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करीत तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याकामी पूजाने त्यांना मदत केली. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
 

Web Title: Three men rape migrant girl with the help of a third-party; incident in Parli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.