शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

ही अनोखी गाठ! विरोधाला झुगारून जीवन अन् तृतीयपंथी साक्षीने सुरू केला सुखाचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 18:50 IST

कुटुंबियांचा टोकाचा विरोध झुगारून दोघेही अखेर विवाह बंधनात अडकली

- मधुकर सिरसटकेज (बीड) : हिंगोली येथील  तृतीय पंथी साक्षी ( 20 ) आणि गेवराई येथील जीवन ( 24) दोघांना  एकमेकांचे विचार पटले आणि त्यांची मने जुळली.  पुढे जाऊन त्यांनी लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, जीवनच्या नातेवाइकांनी यास विरोध केला. विरोधाला न जुमानता प्रेमात आकंठ बुडालेल्या जीवन आणि साक्षी यांनी अखेर घराबाहेर पडत सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीने महाशिवरात्री दिनी लग्न केले. 

हिंगोली येथील साक्षी नर्सिंगचे शिक्षण घेते तर गेवराई येथील जीवनने पशूधन विकास अधिकाऱ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तो सध्या केज शहरात खाजगी पशू रुग्णालयात नोकरी करतो. सहा महिन्यांपूर्वी जीवन आणि साक्षी यांची ओळख गढी- बीड रोडवरील टोल नाक्यावर झाली. जीवनचा गावाकडे जाण्याचा मार्ग तोच असल्याने नियमित भेटी होत गेल्या. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे मनोमन ठरविले होते. परंतु, समाजात नाचक्की होईल म्हणून जीवनच्या नातेवाईकांनी या विवाहाला विरोध केला.  

कुटुंबियांकडून टोकाचा विरोध होत असल्याने दोघे केज येथे आले. येथे सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी जिल्हा समितीच्या सदस्या गौरी शिंदे यांची भेट घेऊन दोघांनीही लग्न करून आयुष्यभर सोबत राहणार असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गौरी शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, योगेश गायकवाड, बबलू साखरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील भीमनगर येथील विहारात बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पाडला. 

टॅग्स :marriageलग्नBeedबीडTransgenderट्रान्सजेंडरsocial workerसमाजसेवक