'हे तर षडयंत्र, पर्दाफाश करणार, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल'; सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 05:13 IST2025-02-16T05:12:28+5:302025-02-16T05:13:42+5:30
सरपंच हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपासून धस हल्लाबोल करीत आहेत.

'हे तर षडयंत्र, पर्दाफाश करणार, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल'; सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं
बीड/जालना : मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या प्रकरणावरून षडयंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश करणार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी आष्टीमध्ये दिला.
सरपंच हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपासून धस हल्लाबोल करीत आहेत. अशातच धस हे मंत्री मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. या भेटीवर विरोधकांनी टीकेची उठविल्यानंतर धस यांनी आपली बाजू मांडली.
हा लढा सुरूच राहील. तसेच मुंडे यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण ७३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले, असेही आमदार धस यांनी सांगितले.
समाजाचा विश्वासघात करणे ही साधी गोष्ट नाही. ज्यांनी धस-मुंडे गुप्त भेट बाहेर काढली त्यांना मार्क दिले पाहिजेत. धसांच्या रूपात आधुनिक फितूर दिसला.
मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
मंत्री मुंडे आणि आमदार धस हे दोघेही ‘जय-वीरू’ आहेत. दोघांचेही एकमेकांना पूरक असे राजकारण असल्याची टीका शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी बीडमध्ये केली.